पोलिसातील माणुस तुम्ही जाणून घ्या हो जरा Salute Aurangabad Police




लाॅकडाऊनमध्ये रेल्वेची परीक्षा देण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने अडचणीत सापडलेल्या तरुणीला एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः नेऊन सोडले. त्याने केलेल्या या मदतीमुळे तरुणाला परीक्षा देता आली. या कामगिरीची दखल खुद्द गृहमंत्र्यांनी घेत त्याचे कौतुक करणारे ट्विट केले. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली.


खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एक ट्वीट करत महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेअर केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देतांना महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात असं म्हणत औरंगाबादमधील पोलिस कर्मचाऱ्याने अडचणीत सापडलेल्या तरुणीला केलेल्या मदतीचा उल्लेख केला.

महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, याचं उदाहरण औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी हनुमंत चाळनेवाड यांनी दाखवून दिले आहे. एका परीक्षार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर सोडण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं हे काम कौतुकास्पद आहे.



 तर आपल्या ट्वीटमध्ये अनिल देशमुख म्हणाले, 'औरंगाबादमध्ये शनिवारी लॉकडाऊन सुरू असताना रेल्वे बोर्डाची परीक्षा द्यायला जाणारी विद्यार्थिनी वाहन मिळत नसल्याने गोंधळली होती. मात्र, पोलीस शिपाई हनुमंत चाळनेवाड यांनी तिला स्वतः परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले. चाळनेवाड यांच्या या माणुसकीला माझा सलाम.


तरुणी घडलेला किस्सा सांगतांनाचा व्हिडिओ



टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें