कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यामध्येही लॉकडाऊन
महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे परभणीत स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज १२ मार्च पासून रात्रि १२ वाजेपासुन्
या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे १३ आणि १४ मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. आज मध्यरात्रीपासून सुरु झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असेल.
यामुळे परभणी आणि शेजारील जिल्ह्यांमधील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें