महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात.. औरंगाबादमघ्ये पॉझिटीव्हीटी रेट ३० टक्के...

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला पत्र पाठवलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्रात  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकारने ज्या प्रकारची काळजी घेतली होती, त्या सर्व उपाययोजना करणं गरजेचं, असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवत कोरोनाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितलं आहे. होम आयसोलेशनबाबत पुन्हा समीक्षा करा. टेस्ट पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी करा. तसंच प्रत्येक पॉझिटीव्ह रूग्णाचे २०-३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा, कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करा, असा सल्ला केंद्राने दिला आहे.

याशिवाय, राज्यातील आरोग्य सुविधा पुरेशा आहेत, असं देखील केंद्राने म्हटलं आहे.

नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन केल्याचा फार कमी परिणाम संसर्ग रोखण्यासाठी होतो. मुंबईत टेस्ट पॉझिटीव्हीटी रेट ५ टक्के तर औरंगाबादमघ्ये ३० टक्के आहे. फिल्ड स्टाफला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समजलं नाही. हे कुटुंब आणि शेजाऱ्यांपुरतं मर्यादीत राहिलंय, असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्रीय टीमने पाहिलं की जिल्हा प्रशासन फारसं काळजीत दिसत नाही, असं केंद्राने म्हटलं आहे.

टिप्पणियाँ