जिल्ह्याधिकरि सुनील चव्हान


वैजापूर  येथील कोविड केयर सेंटरची पाहणी करण्यासाठी जात असताना गंगापूर आणि वैजापूर येथील रस्त्यावर कोरोना नियमांच उल्लंघन झाल्याच निर्दशनास येताच  जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण यांनी गाडी थांबवत ध्वनिक्षेपाच्या माध्यमातून जनजागृती केली.

मास्क नसणाऱ्या व्यक्तींना मास्क दिले. 

तसेच मास्क न घातलेल्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोना नियमांच उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे भयंकर वास्तव समजावत त्रिसूत्रीचे महत्व सांगितले.
गंगापूर येथील लासुर नाका परिसरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील दुकानदार आणि फळविक्रेता यांच्यावर कारवाई करत प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात बशीर आईस्क्रीम अँड कोल्ड ड्रिंक सेंटर यांच्याकडून आणि राजेश मेडिकल यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

टिप्पणियाँ