जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे काय परिस्थिती आहे?
राज्यात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता आहे.
औरंगाबाद, जळगाव आदी शहरांमध्येही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
अकोल्यात 2 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 मार्चच्या रात्रीपासून ते 14 मार्चच्या सकाळी 6 वाजेपर्यंत घरातून बाहेर निघण्यास परवानगी नसणार आहे.
अत्यावश्यक सेवा या दरम्यान सुरू राहणार आहेत. एकट्या अकोला जिल्ह्यात ऍक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 4500 च्या पुढे आहे.
पुण्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. एवढेच नाही तर, 31 मार्चपर्यंत पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पुण्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मॉल, बाजार सिनेमा हॉल रात्री 10 पर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. घरपोच सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार. लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.
नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान कडक प्रतिबंध असणार आहे. यासंबधीची माहिती पालमंत्री नितिन राऊत यांनी दिली आहे.
परभणी मध्ये देखील नुकताच लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, 15 तारखेपर्यंत कडक निर्बंधात लॉकडाऊन पार पडणार असल्याची चिन्हे आहेत.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें