या वर्षीही पैठण येथील नाथषष्ठीची यात्रा रद्द..
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने नाथषष्ठीच्या तोंडावरच जिल्हा प्रशासनाला पैठणची यात्रा रद्द करावी लागली होती व आता कोरोना संपल्या सारखे वाटत असतांनाच पुन्हा नाथषष्ठीच्या तोंडावरच कोरोनाची दुसरी लाट आल्याने प्रशासनाने यंदाची नाथषष्ठी यात्रा देखील रद्द केलेली असून तसे पत्र आज सोमवारी (१५) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रसिद्ध केले आहे.
मराठवाड्यातील अत्यंत लोकप्रिय व लाखो नाथभक्तांना एकत्र आणणारी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्र येणं योग्य नसल्यानं ही यात्रा स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिले आहेत.
याबाबत जिल्हाप्रशासनाने संबंधित जिल्हे आणि तालुक्यांना याबाबत कळवले आहे की, कोव्हीड १९ च्या साथरोग निमित्ताने पैठण येथील नाथषष्ठी यात्रा उत्सव जो दि.३१ मार्च ते दि.३ एप्रिल दरम्यान भरणार होता, तो रद्द करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशानुसार भक्त-भाविकांना व दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश नाकारला आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें