महाडीबीटी पोर्टल योजना : - अर्ज एक-योजना अनेक

 ( महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास पुनःश्च सुरवात

➡️राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर " शेतकरी योजना " या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . 

➡️या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. 

➡️सन २०२१-२२ करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केला आहे . परंतु त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील . असे अर्ज सन २०२१-२२ करिता ग्राह्य धरले जातील , त्याकरिता त्यांच्या कडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही.

➡️सन २०२१-२२ करिता वरील अर्जातील ज्या बाबींकरिता अर्ज केलेला नाही त्या बाबींचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल. 

➡️महा - डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे . 

➡️या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

➡️ महा - डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वताच्या मोबाईल/संगणक / लॅपटॉप / टॅबलेट , सामुदायिक सेवा केंद्र ( CSC ) , ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ . माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील .

➡️ " वैयक्तिक लाभार्थी " म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा - डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल .

➡️ अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा - डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल . त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही .

➡️सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई - मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे .

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें