लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सुद्धा घाटीच्या डॉ. येळीकर यांना कोरोनाची लागण


मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी शहरातील एमजीएम रुग्णालयात ॲडमीट झाल्या आहेत.

डॉ. येळीकर यांना खोकला, ताप आदी लक्षणे दिसून आल्याने त्यांनी घाटीत स्वॅब दिला. शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात ॲडमीट झाल्या. तर शनिवारी त्यांच्या घरातील सदस्यांचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे.

१६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर ३० जानेवारी रोजी त्यांनी घाटीत पहिला डोस घेतला होता.

त्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेतलेला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना खोकला, ताप आदी लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी घाटीत तपासणी करून घेतली होती. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट शुक्रवारी मिळाला.

घाटी रुग्णालयात सर्व बेड हे ऑक्सीजनयुक्त आहेत. सध्या मला ऑक्सीजनची गरज नाही. घाटीतील बेड गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी मी खासगी रुग्णालयात ॲडमीट झाले आहे, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.

टिप्पणियाँ

  1. असे असेल तर ती लस टोचून काय फायदा

    जवाब देंहटाएं
  2. कदाचित व्हैक्सिनची कोल्ड चैन ब्रेक झाल्यामुळे तिचा प्रभाव संपुष्टात आला असावा

    जवाब देंहटाएं
  3. दूसरा डोस घेल्यानंतर सुध्दा कोरोना कसे काय झाले ?
    Madam तर डॉक्टर आहेत व घाटीत dr आहेत

    जवाब देंहटाएं
  4. दुसरा डोस घेतल्यानंतर
    2-3 आठवडे
    धोका असतो

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें