‘माझ्या जोडीदार आता ईशा’संजना यांनी संजना दानवे म्हणून फिरावं..
हर्षवर्धन जाधव सध्या त्यांच्या सहकारी ईशा झा यांच्यासह मतदारसंघात दौरे आणि मेळावे करत आहेत. दुसरीकडे संजना जाधवही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. संजना जाधव या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभात दिसून येत आहेत. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात संजना जाधव या माझी पत्नी म्हणून कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. ज्या पतीला तुम्ही हा माणूस बरोबर नाही असं म्हणताय, त्याच्या नावाने फिरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडीओत म्हटलंय.
‘माझ्या जोडीदार आता ईशा’
इतकच नाही तर, तुम्ही अत्यंत वाईट पद्धतीनं त्रास देत आहात. ग्रामपंचायत निवडणुकीतही तुम्ही तुमच्याच मुलाविरोधात पॅनल उभा केला. आता पुन्हा मतदारसंघात फिरत असताना तुम्ही संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरत आहात. हा घाणेरडेपणा आहे. राजकारणासाठी, स्वार्थासाठी माणूस किती खाली पडू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणून संजना जाधव आहेत. मी मतदारसंघातील तमाम नागरिकांना सूचना करतो की, माझ्या जोडीदार आता ईशा आहेत, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.
संजना यांनी संजना दानवे म्हणून फिरावं
मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अशावेळी त्या आपण संजना हर्षवर्धन जाधव असल्याचं सांगत असतील तर हा निर्लज्जपणा आपण लक्षात घ्यावा. मध्यंतरी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मला आणि ईशाला माझ्या मातोश्रींनी आशीर्वाद दिले आहेत. अशास्थितीत संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणून फिरत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. त्यात कुणीही समाविष्ट होऊ नये. संजना यांनी संजना दानवे म्हणून नक्की फिरावं, असंही हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें