विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विजतोडणीची कारवाई होणार....

💁🏼‍♂️उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात चर्चा होईपर्यंत वीज बिलाची थकबाकी असणाऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दोन मार्चला दिले होते. थकबाकीदारांच्या वीज तोडणीला मिळालेल्या स्थगितीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे माहिती दिली की थकबाकीदारांच्या वीज तोडणीला आता स्थगिती राहणार नसून विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणतर्फे विजतोडणीची कारवाई करण्यात येणार आहे.

➡️यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी काढलेल्या आदेशानुसार महावितरणच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वीज तोडण्याची मोहीम राबवण्यासाठी कामावर पुन्हा रुजू होण्याचं सांगण्यात आलं आहे.

➡️ लॉकडाउनच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या महावितरणला त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी त्वरित आपली वीज बिल भरणा करून होणाऱ्या गैरसोयीला टाळावं असं आवाहन ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेत केलं आहे..



                                Contact For Advertising..
                                          9822088992
                                          9822088902

टिप्पणियाँ