सख्या दिरानेच केला भावजाई वर अत्याचार

पती बरोबर सामंजस्य घडवितो, असे सांगून थोरल्या दिराने भावजयीला शहरात आणले. त्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यास  तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. 

दिरानेच बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे घाबरलेल्या पीडितेने काही दिवस मौन पाळले. परंतु अखेर बुधवारी तिचा संयमाचा बांध फुटला आणि रात्री साडेदहाच्या सुमारास तिने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक म्हस्के करत आहेत.

 पीडित महिला ही ग्रामीण भागातील आहे. तिचा आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरू होता. हीच संधी साधून दिराने तिला भावाशी समेट घडवून आणण्याचे आमिष दाखवून शहरात आणले आणि हे दुष्कृत्य केले. 

हा प्रकार ४ ते ५ ऑक्टोबर २०२० याकाळात घडल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें