औरंगाबाद शनिवार-रविवार लॉकडाउन काय चालू काय बंद...?


💁🏼‍♂️औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन आहे. 

चालू राहणाऱ्या सुविधा

वैधकीय सेवा, वृत्तपत्र मीडिया संदर्भातील सेवा, दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला व पुरवठा, जीवनावश्यक वस्तू दुकाने, पेट्रोल पंप,गॅस एजन्सी, सर्व वाहतूक सेवा (खाजगी व सरकारी) रिक्षा, बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा (फक्त स्टॅण्ड अलोन) चिकन, मटण, मास, अंडी, मच्छी इत्यादी, वाहन दुरुस्ती दुकाने व वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा.

हे बंद राहणार

दुकाने, बाजार पेठ,मॉल, चित्रपट गृहे,हॉटेल (प्रत्यक्ष डायनींग सुविधा बंद डिलिव्हरी रात्री ११ पर्यंत),सर्व खाजगी कार्यालय/ आस्थापना.

➡️ या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात शेकडो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. 

➡️गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

 ग्रामीणमध्ये सक्रिय ७०४ रुग्णांवर उपचार सुरू

😨ग्रामीणमध्ये दोनशेहून अधिक गावांत कोरोना संसर्ग पोहोचला असून 
औरंगाबाद तालुक्यात २५७, 
वैजापूर १४१,
गंगापूर १०४, 
फुलंब्री २३, 
कन्नड ७७, 
खुलताबाद २३, 
सिल्लोड ४६, 
सोयगांव ६ येथे सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें