दहावी व बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहिर, विद्यार्थ्यांना खालील लिंक वर परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध..
💁🏼♂️महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा सतत पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले व काल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून दिले.
10 वी, 12 वी परीक्षा कधी ?
📄 बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा - 5 एप्रिल ते 22 एप्रिल
📄 दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा - 12 एप्रिल ते 28 एप्रिल
✍🏻 बारावीची लेखी परीक्षा - 23 एप्रिल ते 21 मे
✍🏻 दहावीची लेखी परीक्षा - 29 एप्रिल ते 20 मे
💁🏼♂️या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी चांगलीच सुरु झाली आहे.
➡️ कोरोनामुळे शाळाच भरल्या नाहीत त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करुन दिले आहेत .
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे .
प्रश्नसंच ' असे ' डाऊनलोड करा
➡️ राज्य शिक्षण मंडळाकडून विषयानुसार प्रश्चसंच पुरविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना हा प्रश्नसंच वेबसाईटवरुन डाऊनलोड करावा लागेल व त्याचा आपल्या अभ्यासासाठी उपयोग करावा , असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी आहे .
10 वी व 12 वी परिक्षेसाठी प्रश्नसंच डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi
➡️ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
R
जवाब देंहटाएं