गंगापुर तालुक्यातील कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलची जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण यांनी पाहणी केली.
यावेळी फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांचे 17 तारखेच्या आत लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
काही अडथळे आल्यास ते सोडविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे पाठीशी आहे. अश्या शब्दात आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत,त्यांना संपूर्ण ताकतीनिशी कोरोना विरुद्ध कार्य करण्यास प्रोत्साहन दिले.
कोविड केअर सेंटर मधील रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या उपचार सुविधा, जेवण याबाबत चौकशी केली.
तसेच लॉकडॉन लागू असताना काही नागरिक रस्त्यावर विनामास्क फिरताना आढळून आले त्यांच्यावर लगेच दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
यापुढे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, हात धुणे या त्रीसुत्रीचा वापर करणे व इतरांना सांगणे याबाबत सूचित केले.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें