पुण्यात लॉकडाऊन नाही. पण कडक निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यानं बंद राहणार आहेत. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

टिप्पणियाँ