एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी आक्रमक
📄महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन दिवसावर म्हणजेच 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले असून रस्त्यावर उतरलेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत त्यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट ते महात्मा फुले चौकापर्यंत फेरी काढली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचा निर्णय रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
➡️औरंगाबाद येथील औरंगपूरा भागात मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यासह इतर भागातून आलेले तरुण-तरुणी एमपीएससी परीक्षेची तयारी करित असतात.
➡️ महाराष्ट्रात विविध जिल्ह्यासह औरंगाबादेत देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत परिक्षार्थ्यांचे आंदोलन पेटले आहे. औरंगाबाद येथील महात्मा फुले चौकात एमपीएससीच्या परिक्षार्थींनी मोठा राडा घातला. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर एकत्र येत या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
➡️पोलीस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें